Sripuram Sri lakshmi Narayani Golden Temple
Kubera Yantra
Kuber Puja Marathi

कुबेरची उपासना

आपल्या घरात सदैव सुख-समृद्धी असावी असं आपल्याला वाटत असतं. यासाठी घरातील आवक वाढावी, धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी, असं आपल्याला नेहमी वाटतं. धर्मशास्त्रात यासाठी एक सोपा उपाय सांगितलेला आहे.

घरामध्ये कुबेराची मूर्ती अथवा फोटो असावा. कुबेर म्हणजे देव देवतांच्या संपत्तीचा रक्षक, खजिनदार. आपल्या घरातील ऐश्वर्य वाढावं यासाठी या कुबेराने आपल्या घरात निवास केला पाहिजे.

कुबेराची मूर्ती नेहमी उत्तर दिशेला असावी. दररोज कामाला सुरुवात करण्यापूर्वी मनोभावे प्रार्थना केल्यास पैशाची आवक, ऐश्वर्य आणि समाधान वाढते.

पूजा आणि समर्पण

मंत्रपुष्पांजली

आरत्यांच्या अखेरीस आणि यज्ञविधीच्या समाप्ती प्रसंगी जी मंत्रपुष्पांजली म्हटली जाते ती वैश्रवण राजाधिराज म्हणजे भगवान कुबेरांनाच उद्देशून अर्पण केलेली असते.

जसा आद्यपुजेचा मान श्री गणेशांचा आहे, तसाच वैश्रवण कुबेरांच्या मंत्र पुष्पांजली खेरीज कोणत्याही पवित्र धार्मिक विधीची समाप्ती होत नाही.

कुबेरची पूजा

करंगळी जवळच्यां बोटाने कुबेराला गंध लावावे. अक्षता, हळद-कुंकू, गुलाल, बुक्का आणि ताजी सुवासिक फुले अर्पण करावीत. लाल रंगाची फुले धनदेवता कुबेरांना अतिशय प्रिय मानली जातात.

धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, नमस्कार, आरती आणि प्रदक्षिणा हे सर्व विधी मन:पूर्वक व शांतचित्ताने करावेत.

कडुलिंबाचे महत्त्व

धनदेवता कुबेरांना कडुलिंबाची पाने अत्यंत प्रिय असल्याने घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कडुलिंबच्या पानांचा टाळ असावा. त्याने वाईट शक्तीचा नाश होतो.

दररोज कुबेरांच्या पोटाला कडुलिंबाची पाने लावून प्रार्थना केल्यास पावित्र्य टिकते आणि धनदेवता कुबेर प्रसन्न होतात.

Kuber Puja

पूजेतील प्रमुख अर्पण

पाने: कडुलिंबाची पाने घरात आणि पूजेत वापरल्यास वाईट शक्तीचा नाश होतो व जागेत पावित्र्य राहते.

धूप आणि दीप: उदबत्तीचा सुगंध कुबेरावर दरवळेल अशी ठेवावी आणि निरांजन कुबेराच्या उजव्या बाजूस ठेवावे.

नैवेद्य आणि तांबूल: पंचामृत, दूध, पेढे, फळे, पक्वान्न आणि विड्याची पाने यथाशक्ती अर्पण करावीत.

प्रार्थना: व्यावहारिक मागण्या न करता फक्त कृपा मागावी. कुबेराच्या कृपेनेच सर्व गोष्टी यशस्वी होतात.

मंत्रपुष्पांजली

आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणण्याची पध्दत आहे.

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या:संति देवा: ।।
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मे कामान् कामकामाय मह्यंकामेश्वरो वैश्रवणो ददातु ।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम: ।
ॐ स्वस्ति । साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्याईस्यात् सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात् । पृथिव्यैसमुद्रपर्यंताया एकराळिती ।

प्रस्तावना आणि अर्थ

प्रस्तावना

प्रस्तुत मंत्रपुष्पांजली ही वेदोक्त आहे. वेदोक्त मंत्रांना स्वर असतात. त्यामुळे हे मंत्र या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीकडून नीट शिकून, त्याचा चांगला सराव करून मगच म्हणावेत.

वेदोक्त मंत्र चुकीचे म्हटले गेल्यास त्याचा म्हणणाऱ्याला त्रास होऊ शकतो, म्हणून भावनेबरोबर शुद्ध उच्चारही तितकाच महत्त्वाचा आहे.

अर्थ

देवांनी यज्ञ करून यज्ञपुरुषाची, यज्ञस्वरूपी परमेश्वराची पूजा केली. यज्ञाने पूजन करणे हा त्या काळी प्रमुख धर्म आणि साधनामार्ग होता.

राजाधिराज, सर्वशक्तिमान अशा वैश्रवण कुबेराला नमन करून सर्व कामना पूर्ण होवोत, कल्याण होवो, ऐहिक आणि पारमार्थिक उन्नती होवो अशी प्रार्थना या मंत्रांतून केली जाते.

कुबेराला वैश्रवण असेही नाव आहे. तो धनाचा अधिपती, लोकपाल आणि संपत्तीचा संरक्षक मानला जातो.

कुबेर यंत्र

ॐ हिम् श्रिम् क्लिम् वित्तेश्र्वराय नम :

या यंत्रातून येणारी ऊर्जा सदैव आपल्याभोवती कवच म्हणून काम करते. घरात किंवा धंद्याच्या ठिकाणी कुबेर यंत्र असणे शुभ मानले जाते.

कोणत्याही बुधवारी, शुक्रवारी, धनत्रयोदशी, पौर्णिमा किंवा एकादशीला उत्तराभिमुख बसून भगवान कुबेरांना नमस्कार करून या मंत्राची १०८ वेळा माळ करावी.

दसरा आणि धनत्रयोदशी

दसरा: आपट्याची पाने सोने म्हणून देण्याच्या प्रथेच्या मागे भगवान कुबेरांच्या ओदार्याची कथा जोडलेली आहे.

धनत्रयोदशी: धन संचय, कुबेर पूजन, चोपडा पूजन आणि शुभ खरेदी यासाठी हा दिवस अत्यंत मंगल मानला जातो.

पूजाविधी: वडीलधाऱ्यांना नमस्कार करून कुलदेवतेचे पूजन करावे, नंतर पुष्प, धूप, दीप, पंचामृत आणि कडुलिंबाच्या पानांनी कुबेर पूजन करावे.

कडूलिंब अथवा कडूनिंब हा भारतीय उपखंडात आढळणारा वृक्ष असून त्याला अनेक भारतीय भाषांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.

  • संस्कृत - निम्ब, तिक्तक, अरिष्ट, पारिभद्र, पिचुमंद
  • हिंदी - नीम, नीमला
  • बंगाली - निमगाछ
  • कानडी - बेवु
  • गुजराती - लींबडो
  • मलयालम - वेप्पु, अतितिक्त
  • तमिळ - कड्डपगै, अरुलुंदी
  • तेलगु - निम्बमु
  • इंग्रजी - Indian lilak, Neem, Margosa Tree
  • लॅटिन - Azadirachta indica

कडुलिंबाच्या ओषधी गुणांना प्राचीन इतिहास आहे. चरक आणि सुश्रुत संहितेत त्याचा उल्लेख येतो. ग्रामीण भागात त्याला ओषधालय म्हणूनही मान दिला जातो.

पाने, निंबोळ्या, फांद्या, साली आणि तेल यांचा उपयोग त्वचारोग, जंतुनाशन, रक्तशुद्धी, ताप, जखमा, अपचन आणि इतर अनेक आजारांवर केला जातो.

कडुलिंब खाणे रूढी गुढी पाडव्याची, आधी कडु प्राप्ती मग अमृताची.

@ 2026 Kuber Golden Temple. All Rights Reserved.

bck-to-top